<---- Script to Prevent Copy Paste-----> <--- Code End----->

Online Fraud : कल्याणमधील तरूणीची ऑनलाईन फसवणूक; अज्ञाताने पाठवलेल्या मेसेजवर क्लिक करताच बॅंकेतून पैसै गायब

Online Fraud : कल्याणमधील तरूणीची ऑनलाईन फसवणूक; अज्ञाताने पाठवलेल्या मेसेजवर क्लिक करताच बॅंकेतून पैसै गायब

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा भागात रहात असलेल्या एका तरूणीची एका भामट्याने ऑनलाईन व्यवहारातून 88 हजार 500 रूपयांची फसवणूक केली आहे. फसगत झालेल्या या तरूणीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या महिन्यात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

नीलम शिवाकांत दुबे (28) असे फसवणूक झालेल्या तरूणीचे नाव आहे. सद्या ही तरूणी शिक्षण घेत आहे. गेल्या महिन्यात तक्रारदार तरूणी नीलम ही संध्याकाळच्या सुमारास अंधेरी ते घाटकोपर दरम्यान मेट्रोने प्रवास करत होती. यावेळी तिच्या मोबाईलवर एका अज्ञाताच्या नंबरवरून मेसेज आला. या तरूणीने सदर मेसेज पाहिला. तरूणीचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी संलग्न असल्याने भामट्याने पाठवलेला मेसेज उघडताच तिच्या बँक खात्यामधील 39 हजार रूपये आणि पाठोपाठ 49 हजार रूपये 500 रूपये चलाखीने स्वत:च्या बँक खात्यात वळते केले. ही रक्कम ॲमेझाॅनच्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज तरूणीला आला. आपण कोणत्याही वस्तुची खरेदी केली नाही तरी, आपल्या बँक खात्यामधून अचानक पैसे कसे वळते झाले? असा प्रश्न तक्रारदार तरुणीला पडला. एवढी मोठी रक्कम खात्यामधून वळती झाल्याने तरूणी अस्वस्थ झाली.

काही दिवसांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी तिला अज्ञात भामट्याने मेसेजच्या माध्यमातून व्यवहार करून ही रक्कम हडप केली असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर नीलम हिने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. बँकेत जाऊन चौकशी करण्यास विलंब झाला. त्यामुळे तक्रारदार दाखल करण्यास उशीर झाला आहे, असे या तरूणीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news