आंबिवलीकर गृहिणीचा लुटारूशी रक्तरंजित संघर्ष; सशस्त्र हल्ल्यातून बचावलेल्या गृहिणीला ठाण्यात हलविले

आंबिवलीकर गृहिणीचा लुटारूशी रक्तरंजित संघर्ष; सशस्त्र हल्ल्यातून बचावलेल्या गृहिणीला ठाण्यात हलविले
Published on: 
Updated on: 

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली परिसरात राहणाऱ्या गृहिणीने लुटारूशी संघर्ष केला. मुलीला शाळेतून सुटलेल्या मुलीला आणण्यासाठी निघालेल्या या माऊलीच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून लुटारू पळण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेच्या चपळाईने या रणरागिणीने लुटारूशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. मात्र लुटारूने त्याच्याकडे धारदार शस्त्राने वार करून गृहिणीला जायबंदी केले. लुटारूने केलेल्या सशस्त्र हल्ल्यातून बचावलेल्या या बहाद्दर गृहिणीला ठाण्यात हलविण्यात आले असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 प्रिया सावंत असे जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या गृहिणीचे नाव असून तिच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गृहिणी मंगळवारी सकाळच्या सुमारास तिच्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी निघाली होती. इतक्यात लुटारूने भररस्त्यात तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वतःचा सौभाग्यालंकार वाचविण्यासाठी प्रिया त्या लुटारूवर तुटून पडली. आपण आता पकडले जाऊ, या भीतीमुळे लुटारूने कमरेला खोचलेले धारधार शस्त्र उपसून प्रियावर हल्ला चढविला. गळा, हात, पोट, मान साआणि पाठीवर वार झाल्याने प्रिया रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळली. हे पाहून हल्लेखोर लुटारूने तेथून भरधाव वेगात पोबारा केला. रस्त्यावरील पादचारी धावून आले. त्यांनी उचलून दवाखान्यात नेले. मात्र प्रकृतीला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने तिची रवानगी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलकडे करण्यात आली. एकीकडे डॉक्टरांनी तातडीने उपचार करून प्रियाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. तर दुसरीकडे तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांना गुन्हा नोंदवून हल्लेखोर लुटारूचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news