Ajit Pawar NCP : आनंद परांजपे झाले अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते | पुढारी

Ajit Pawar NCP : आनंद परांजपे झाले अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना त्याचदिवशी पाठिंबा दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे यांची राष्ट्रवादी पक्षाने तडकाफडकी हकालपट्टी केली. या हकालपट्टीनंतर चोवीस तासात पुन्हा एकदा परांजपे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी गटाच्या ठाणे शहराध्यक्षाबरोबर प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी, खासदार सुनील तटकरे,मंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला उपस्थित होते.

Back to top button