Brother and sister drowned : कुत्र्याला आंघॊळ घालण्यासाठी गेलेल्या बहीण भावांचा तलावात बुडून मृत्यू | पुढारी

Brother and sister drowned : कुत्र्याला आंघॊळ घालण्यासाठी गेलेल्या बहीण भावांचा तलावात बुडून मृत्यू

नेवाळी; पुढारी वृत्तसेवा : कल्याण ग्रामीण येथे कुत्र्याला आंघोळ घालायला गेलेल्या बहीण भावांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २८) घडली. रणजित रवींद्रन आणि कीर्ती रवींद्रन या बहीण भावांचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि मानपाडा पोलिसांनी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतले. (Brother and sister drowned)
आठवड्याच्या प्रत्येक रविवारी दोघे बहीण भावंडं दावडी येथील तलावात कुत्र्याला अंघोळ घालण्यासाठी जात होते. या रविवारी (दि. २८) देखील दोघे बहीण भावंडं दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कुत्र्याला अंघोळ घालण्यासाठी तलावाच्या काठी गेले होते. मात्र किर्तीचा पाय घसरला आणि ती तलावाच्या पात्रात पडली. किर्तीला वाचवण्यासाठी गेलेला रणजित देखील तलावाच्या पात्रात उतरला आणि तो देखील तलावात बुडाला. दोघेही मदतीसाठी आवाज देत होते. तलावाच्या बाजूला राहणाऱ्या एका उत्तर भारतीय नागरिकाने त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी देखील मारली. मात्र त्या दोघांना बुडताना वाचविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. काही वेळाने दोघेही दिसेनासे झाले. त्यामुळे या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना देण्यात आली. पोलीस पाटील यांनी तातडीने मानपाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मानपाडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. (Brother and sister drowned)
मृत पावलेले दोघेही भावंडं डोंबिवली पाश्चिमेतील उमेश नगर मधील राहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली असून कुटुंबीय गावी असल्याची माहिती समोर आली. सध्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस अधिकच तपास करत आहेत.

कुत्रा सुखरूप… पण सांभाळ करणारी भावंडे बुडाली (Brother and sister drowned)

कुत्र्याला आंघॊळ घालण्यासाठी कीर्ती आणि रणजित हे आठवड्याच्या प्रत्येक रविवारी दावडी गावच्या डोंगराजवळ असलेल्या तलावाच्या काठी जात असत. मात्र रविवारीच त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला पण कुत्रा मात्र सुखरूप आहे.

हेही वाचा

Back to top button