

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : कल्याण रेल्वे स्थानकावर एका बेवारस पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये ५४ डीटोनेटर (स्फोटके) आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षा यंत्रणेत वाढ केली.
बुधवारी दुपारच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १ च्या बाहेरील बाजूस बेवारसरित्या दोन पुठ्याचे बॉक्स संशयित रित्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. रेल्वे पोलिसांनी त्वरित सदरच्या बेवारस पडलेल्या बॉक्सची डॉग स्कॉड युनिट बीडीडीएस कडून तपासणी करण्यात आली असता त्या बेवारस दोन बॉक्स मध्ये अंदाजे ५४ डीटोनेट (स्फोटके) मिळून आले आहेत. दरम्यान या घटनेचां पोलीस अधिक तपास करीत आहेत.