वळपाडा येथील दुर्घटना ग्रस्त इमारतीला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

वळपाडा येथील दुर्घटना ग्रस्त इमारतीला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री (दि. २९) अकरा वाजता भेट दिली. यावेळी बचाव पथकाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

भिवंडीत अनधिकृत व धोकादायक तसे अती धोकादायक इमारतींचा प्रश्न वारंवार समोर येत असतो,त्यातच इमारत दुर्घटना घडल्याच्या देखील अनेक घटना भिवंडीत घडल्या असून या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे आहे असे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.भिवंडीतील अति धोकादायक इमारतींचा लवकरात लवकर सर्वे करून अति धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह भिवंडी मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना यावेळी दिल्या.

भिवंडीतील क्लस्टर योजना राबविण्यासाठी या योजनेसाठी बाधक असलेल्या जाचक अटीनियमानमध्ये बदल करून, लवकरात लवकर भिवंडीत क्लस्टर योजना राबविण्यात येइल. माणसांच्या जिवापेक्षा दुसरे काही महत्वाचे नाही असे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.

Back to top button