ठाणे : वडाळा पोलिसांमुळे साडेतीन लाखांचे दागिने मिळाले परत

धारावी : पुढारी वृत्तसेवा : वडाळा टीटी पोलिसांच्या (वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशन ) अथक परिश्रमामुळे टॅक्सीत विसरलेले साडेतीन लाखांचे दागिने परत मिळाल्याची माहिती उघडकीस आली आहे. साडेतीन लाखांचे दागिने परत मिळाल्याने आनंदी झालेल्या महिलेने पोलिसांचे तोंडभरून कौतुक करत आभार मानले.
डोंबिवलीत राहणाऱ्या शारदा पांडुरंग शेलार आणि नेहा नरेंद्र शेलार चिंचपोकळी येथे आल्या होत्या. लग्नाची हळद आटोपून त्यांनी चिंचपोकळी येथून सायन प्रतीक्षानगरला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. टॅक्सी सुरु असताना त्यांनी दागिने एका बॅगेतून काढून पिशवीत ठेवले. आणि दागिन्यांची पिशवी बाजूला ठेवून त्या गप्पा मारण्यात रंगल्या. दरम्यान सायन प्रतीक्षानगर येताच लगबगीने त्या टॅक्सीचे भाडे देऊन टॅक्सीतून उतरल्या. लवकर घर गाठण्याच्या घाईगडबडीत त्यांची दागिन्यांची पिशवी टॅक्सीत राहिली.
घरी गेल्यावर दागिन्यांची पिशवी टॅक्सीत विसरल्याचे महिलेच्या लक्षात येताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. लागलीच त्यानी वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाणे जावून साडेतीन लाख रुपयांच्या दागिन्यांची पिशवी टॅक्सीत विसरल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच सपोनि. अवधूत बनकर यांनी वरिष्ठांच्या आदेशाने पोउनि. प्रशांत गांगड, गंगाराम तांडेल आणि पथकाने कॅमेरा ऑपरेटरसह घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यास सुरुवात केली.
तब्बल तीन दिवसानंतर परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमधून टॅक्सीचा नंबर शोधण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी क्षणाचा विलंब न लावता नंबरच्या आधारे टॅक्सी शोधून काढली आणि चालकाला ताब्यात घेऊन दागिन्यांबाबत चौकशी करून दागिने हस्तगत केले.
हेही वाचा :