ठाणे : मुरबाड तालुक्यात अवकाळी पावसाने आंबा बागेचे मोठे नुकसान

ठाणे : मुरबाड तालुक्यात अवकाळी पावसाने आंबा बागेचे मोठे नुकसान

मुरबाड, पुढारी वृत्तसेवा : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी पट्ट्यात गेली चार ते पाच दिवसांपासून संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उष्णतेत मोठी वाढ झाली होती. दरम्यान, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामळे मुरबाड तालुक्यातील आंबा बागेचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे.

मंगळवारी पहाटे तीन वाजल्यापासून पुन्हा अवकाळी पावसाने सुरुवात केली. त्यामुळे या पावसामुळे सर्वत्र तालुक्यातील वीटभट्टी तसेच भेंडी, काकडी, मिरची, तसेच वाळ, हरभरा यासह कडधान्ये, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाबरोबर गारपीट झाल्याने आंब्याला आलेला मोहर गळून गेला आहे. त्यामुळे आंब्यांच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम होणार आहे. यंदा सर्वत्र आंब्याला चांगला मोहर आला होता. परंतु, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी सरकारने तात्काळ पंचनाम करून नुकसान भरपाई देण्याची मागणी खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन प्रा. प्रकाश पवार यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news