डोंबिवली : पोलिसांच्या खुर्चीवर बसून रील करणारा एकजण तडीपार; मानपाडा पोलीसाची कारवाई | पुढारी

डोंबिवली : पोलिसांच्या खुर्चीवर बसून रील करणारा एकजण तडीपार; मानपाडा पोलीसाची कारवाई

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांच्या खुर्चीत बसून इंस्टाग्रामवर रील बनवणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर एकूण सात गुन्हे दाखल असल्याने त्याला तडीपार करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले. याचे नाव सुरेंद्र पाटील असे आहे.

याबाबतची माहिती अशी की, दोन महिन्यापूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात काही कामानिमित्त गेलेल्या सुरेंद्र पाटील याने पोलिसांच्या खुर्चीत बसून एक रील बनवले होते. त्यानंतर हे रील चांगलेच सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या रीलची पोलिसांनी दखल घेत सुरेंद्र पाटील याला अटक केली.

सुरेंद्र पाटील याच्यावर विविध पोलीस स्थानकात एकूण सात गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पण झाले. यानंतर त्याला पोलिसांनी नोटीस बजावत तडीपार होण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button