कल्‍याण-डोंबिवली मतदार संघात अधिक मतांनी निवडून येऊ : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा कल्याण डोंबिवली मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रितरित्या अधिक लक्ष देऊन लढू तसेच पहिल्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येऊ अशी आशा अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे भाजप पक्षवाढीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात आले होते. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधी पक्ष आणि यूपीए सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

महाराष्ट्रात यूपीए सरकारने जे दहा वर्षात दिले नाही. त्यापेक्षा खूप अधिक पटीने मोदी सरकारच्या काळात दिले आहे. महाराष्ट्रात अनेक योजनांवर मोदी सरकारने स्वतः जातीने लक्ष ठेवून मनापासून काम केले आहे.

गुलाब रसूल यांनी लोहा लोहे को काटता है. आतंकवाद्यांबरोबर लढायचे असेल तर सेनेत तीस टक्के मुस्लिम तरुणांना भरती करा अशी मागणी गुलाब रसूल यांनी केंद्राकडे केली आहे. या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देशामध्ये खेळाची टीम असो किंवा सैन्याची टीम असो कोणत्याही जाती धर्मावरून निवड केली जात नाही, तर त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्यावरून निवड केली जाते असे पत्रकारांशी बोलताना ते म्‍हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्‍या शपथ विधिवर संजय राऊत यांनी दहा अजूबे दुनियेत असून, दोन दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांवर केली होती. यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. यापेक्षा संजय राऊत यांनी केलेल्या घोटाळ्यावर चर्चा केली, तर अधिक बरे होईल असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले.

विरोधी पक्षाकडून रोज सरकार पडण्याची भाषा केली जाते, मात्र ते नुसतीच आशा धरून बसलेले आहेत. मात्र त्यांची निराशा होणार आहे. हे सरकार कोसळणार नाही, तर अधिक मजबुतीने महाराष्ट्राचा विकास करणार आहे असे अनुराग ठाकूर यांनी म्‍हणाले.
अनुराग ठाकूर यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी केलेल्या दौऱ्यामध्ये आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांचा स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामावरून समाचार घेतला होता. या संदर्भात पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला असता, नक्कीच कामाची गती वाढली असून पुढल्या वेळी जो दौरा करीन त्यात महापालिकेने काय कामे पूर्ण केली आहेत याचा आढावा घेईन आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करेन असे ते म्‍हणाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news