ठाणे : कोरावळे गावातील ओढ्याजवळ आढळला मृत बिबट्या !

ठाणे : कोरावळे गावातील ओढ्याजवळ आढळला मृत बिबट्या !

मुरबाड; पुढारी वृत्तसेवा : मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावच्या हद्दीत बुधवारी (दि. ८) सकाळी ओढ्याच्या कडेला एक बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. हा बिबट्या नेमका कशामुळे मृत झाला आहे याची माहिती त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल आल्यावर कळू शकेल अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दर्शना पाटील-बाबर यांनी दिली.

कोरावळे येथे पाणी पुरवठा योजनेचे विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी तेथे कामाला गेलेल्या लोकांना काहीतरी कुजल्याचा वास येऊ लागला. लोकांनी त्या दिशेने शोध घेतला असता ओढ्याच्या कडेला बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने लोकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही घटना कळवली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा करण्यात आला आहे. बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदन करण्यासाठी मुरबाड येथे आणला तेथून तो मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात येणार आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे.

कोरावळे गावच्या परिसरात आठ दिवसांपूर्वी पासून बिबट्या दिसल्याचे लोक सांगत होते. वन विभागाने लावलेल्या कॅमेरा मध्येही बिबट्या आढळला होता. या बिबट्याच्या वावरमुळे कोरावळे ग्रामस्थ व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news