डोंबिवली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक | पुढारी

डोंबिवली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  ‘आम्ही पोलिस आहोत तुम्ही इथे काय करत आहात’ अशी विचारणा  करत डोंबिवली येथील निर्जनस्थळी फिरायला आलेल्या अल्‍पवयीन मुलीला  अत्याचार करणाऱ्या दोघांना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली. दरम्यान, एका कंपनीच्या फोनवरून या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. विष्णू सुभाष भांडेकर ( वय २५, नेवाळी ) आणि आशिष प्रकाशचंद्र गुप्ता ( वय ३२, नांदिवली) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी की, ठाकुर्ली रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या परिसरात १७ वर्षीय मुलगी मित्रासमवेत फिरायला आली होती. विष्णू आणि आशिष परिसरात फिरत होते. यावेळी भांडेकर आणि गुप्ता येथे आले. त्‍यांनी पीडित मुलीचे फोटो काढले. यानंतर दोघांच्या जवळ जाऊन ‘आम्ही पोलीस आहोत तुमचे काय सुरू आहे’ असे विचारत केली. पीडित मुलीच्‍या मित्राला पोलीस स्‍टेशनला घेवून जावे लागले, असे सांगितले. दोघांपैकी एकाजण  तरुणीच्या मित्राला घेऊन गेला आणि तरुणीला तेथेच थांबण्यास सांगितले.  यानंतर एका आरोपीने पीडितेवर अत्याचार केला.

थोड्याच वेळात ठाकुर्ली स्थानकात सोडायला गेलेला दुसरा आरोपी पुन्हा निर्जनस्थळी आला. पहिला आरोपीला ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पाठविले. दुसऱ्याने देखील पीडित मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर या आरोपींनी तरूणीला ठाकुर्ली रेल्‍वे स्थानक परिसरात आणून सोडले. त्यानंतर घडलेली सर्व घटना तिने तिच्या मित्राला सांगितली. रेल्वे स्थानकात असलेल्या नागरिकांच्या घडलेला प्रकार लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी असा लावला आरोपींचा छडा…

या परिसरात त्यादिवशी किती फोन ॲक्टिव्ह होते, याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यानंतर फिर्यादी मुलीने देखील त्या आरोपींकडे कोणत्या कंपनीचा फोन होता ते पोलिसांना सांगितले होते. त्या एका खुणेतून आरोपीचा शोध घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्‍यान,दोन महिन्यापूर्वी विष्णू भांडेकर याने नेवाळी येथे एका घरात चोरी केली होती.

Back to top button