ठाणे : अल्पवयीन फिरस्त्या मुलीचा निर्घृण खून | पुढारी

ठाणे : अल्पवयीन फिरस्त्या मुलीचा निर्घृण खून

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : एका ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून तिचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. दरम्यान या मुलीचा मृतदेह कल्याण रेल्वे स्टेशन परीसरातील एका इमारतीच्या परीसरात आढळून आला असून यासंदर्भात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी (दि.१) सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील न्यू मोनिका इमारतीच्या आवारात एका ९ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी याची माहिती महात्मा फुले पोलीसांना दिली. मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे समजताच पोलीसांनी तपासला सुरुवात केली आहे. ही मुलगी फिरस्त्या असल्याची प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

सध्या इतर फिरस्त्यांची चौकशी सुरू असून तपासादरम्यान एका संशयित फिरस्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा तरुण देखील अल्पवयीन आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयत मुलगी आणि संशयित तरुण हे दोघेही फिरस्ते आहेत. ते स्टेशन परीसरात राहत होते, अशी माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button