कल्याणमध्ये भोंदूबाबाला चार महिन्यांनी ठोकल्या बेड्या | पुढारी

कल्याणमध्ये भोंदूबाबाला चार महिन्यांनी ठोकल्या बेड्या

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : उपचार करण्याच्या नावाखाली जादूटोणा करुन लोकांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला चार महिन्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद आसिफ हिंगोरा (वय ३७, रा. घोडबंदर) असे या भोंदूबाबाचे नाव असून या बाबाने आत्ता पर्यंत किती लोकांना गंडा घातला आहे? याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

कल्याण पश्चिम राहणाऱ्या आरिफा मुलानी (२९) या महिलेचा दीर मानसिक आजारी आहे. काही दिवसांपूर्वी आरीफा हीची बाबा मोहम्मद यांच्याशी भेट झाली. मोहम्मदने महिलेला सांगितले की, मी जादूटोणा करुन आजार बरे करतो. तुमच्या दीरालाही बरे करणार. दीराला बरे करण्याच्या नावाखाली मोहम्मदने आरिफाकडून टप्प्या टप्प्याने जवळपास ५ लाख ३९ हजार रुपये उकळले. परंतु, दीर काही बरा झाला नाही. तेव्हा तिला संशय आला. एप्रिल महिन्यात तिने बाजारपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. दरम्यान, बाबा मोहम्मद हा फरार झाला होता. अखेर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने तपास सुरु झाला. पोलिसांनी भोंदूबाबा मोहम्मदला तब्बल चार महिन्यानंतर कल्याण येथून अटक केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button