31st December Celebration | थर्टी फर्स्टच्या रात्री तळीरामांना सुखरुप घरी सोडण्याची व्यवस्था करा

पोलिसांची बार मालकांना तंबी; तळीराम वाहन चालकांवर राहणार पोलिसांची करडी नजर
police
पोलिसांची करडी नजर राहणारPudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : थर्टी फर्स्टच्या रात्री मद्यपार्टीनंतर होणारे वाहन अपघात रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी मद्यविक्री करणाऱ्या बारमालकांना ग्राहकांच्या वाहनांसाठी चालकाची व्यवस्था करावी आणि त्यांना सुखरूप घरी सोडावे अन्यथा मद्यविक्री करू नये, अशी तंबी दिली आहे. पोलिसांच्या या तंबीवर हॉटेलमालकांनी अभिनव उपाय शोधून काढला असून थर्टी फर्स्टला मनसोक्त पिऊन टल्ली होणाऱ्या तळीरामांसाठी घरपोहोच पोहचवण्यासाठी वाहनांची सोय अशी स्किमच जाहीर केली आहे.

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने थर्टी फर्स्टच्या रात्री अनेक ठिकाणी करमणूक कार्यक्रम तसेच मेजवान्यांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये ओल्या पार्ट्या रंगतात. अशा पार्ट्यांना हजेरी लावणारे तळीराम दारूच्या नशेत गाडी चालवून अपघातांस कारणीभूत ठरतात. त्यामुळे नशेत वाहन चालवणाऱ्यांच्या जिवावरही बेतू शकते. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी काही कडक पावले उचलली आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्री मद्याच्या पार्ट्या झोडणाऱ्यांनी घरी परतण्यासाठी स्वतः वाहन चालवू नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये मद्य पुरविणाऱ्या हॉटेल व बार व्यावसायिकांना पोलिसांकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पार्टी आयोजित करताना निमंत्रितांना अथवा त्यात सहभागी होणाऱ्या मद्यपी ग्राहकांना घरी पोहोचवण्यासाठी वाहन व चालकांची व्यवस्था करावी, अन्यथा मद्यविक्रीची परवानगी नाकरण्यात येईल, अशी तंबीच पोलिसांनी बार व हॉटेल मालकांना नोटीसीद्वारे दिली आहे.

police
Thane Election News : कल्याण-डोंबिवलीत पुन्हा सेना-भाजप वाद वाढला

पोलिसांच्या या तंबीनंतर हॉटेल व बार मालकांनी देखील कायद्याची चौकट राखून पिऊन टल्ली होणाऱ्या खास ग्राहकांसाठी घरपोहोच वाहनांची व्यवस्था केली आहे. तशी स्किमच हॉटेल मालकांनी आपल्या न्यू ईयर पार्टीच्या आयोजनासाठी जाहीर केली आहे. त्यामुळे कायदा देखील पाळला गेलाय आणि टल्ली होणाऱ्या तळीरामांसाठी घरी पोहोचण्याची व्यवस्था देखील झाली.

पोलिसांचे विशेष पथक तैनात

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर थर्टी फ़र्स्टच्या रात्री पोलिसांची करडी नजर राहणार आहे. शहरातील प्रमुख नाक्यांवर श्वासविश्लेषक यंत्राद्वारे पोलिसांची तपासणी पथके तैनात करण्यात येणार आहेत. शहरांमधील विविध सर्वच नाक्या-नाक्यांवर वाहतूक पोलिसांचे पथक फिरणार असून हे पथक श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी चालकांची तपासणी करणार आहे. याशिवाय, येऊर व उपवन परिसरात होणाऱ्या विनापरवाना पाट्र्त्यांवर देखील पोलिसांची करडी नजर राहणार असून येऊरच्या पायथ्याशी वाहतूक पोलिसांचे विशेष पथक तैनात राहणार आहे.

वाहन चालकांची तपासणी करणार

येऊरच्या पायथ्याशी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली असून येथे वाहन चालकांची तपासणी करणार आहेत. तसेच येऊर परिसरातील बंगला मालक व हॉटेल मालकांना लाऊड स्पीकर, डीजे लावण्यास बंदी असल्याचे निदर्शनास आणून दिले असून परिसरातील बंगले व हॉटेल चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news