ठाणे : घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; डल्ला मारण्यासाठी गुजरातमधून यायचा मुंबईत

ट्रॅक्‍टर चोरी प्रकरण
ट्रॅक्‍टर चोरी प्रकरण

ठाणे : पुढारी डेस्क घरफोडी करण्यासाठी गुजरात राज्यामधून मुंबईत येणार्‍या एका सराईत चोराला जेरबंद करण्यात आले आहे. सदर कारवाई बोरिवली पोलिसांनी केली. आरोपी अजित पिल्लई (36, रा. अहमदाबाद, गुजरात) याच्या अटकेमुळे गुन्ह्यांची उकल झाली असून, आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याचे बोरिवली पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील पश्चिम उपनगरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली होती. सदर बाब लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वपोनि निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान एक जण स्कूटीवर फिरताना पोलिसांच्या निदर्शनास पडला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे घरफोडीसाठी वापरण्यात येणारे हत्यार आढळून आले. तसेच स्कूटी वर्सोवा परिसरातून चोरल्याची कबुली त्याने दिली. हा आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने बोरिवलीत 4, गोरेगाव, वर्सोवामध्ये प्रत्येकी एक तर कांदिवलीतील 2 गुन्ह्यांची उकल झाली आहे

गुजरातमध्ये दाखल 30 गुन्हे आरोपी पिल्लई हा सराईत गुन्हेगार आहे. गुजरात पोलिसांनी त्याच्या विरुद्ध बडोदरा, गांधीनगर, अहमदाबाद, खेडा आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या केल्या प्रकरणी 30 गुन्हे दाखल केलेले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news