डोंबिवली : एसी मेकॅनिकच्या नावाखाली चोर्‍या; कल्याणच्या पोलिसांनी फाडला बुरखा | पुढारी

डोंबिवली : एसी मेकॅनिकच्या नावाखाली चोर्‍या; कल्याणच्या पोलिसांनी फाडला बुरखा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : आपल्या इमारतीत कोण येतो-जातो याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. काही ना काही बहाणा करुन चोरटे इमारतीत शिरतात. रेकी करुन घरावर डल्ला मारतात. असाच एक प्रकार कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी उघड आणला आहे. एसी मॅकेनिक म्हणून चोरटा इमारतीत शिरायचा आणि रेकी करुन आपल्या साथीदारासोबत घरे लुटायचा. कल्याणच्या पोलिसांनी अजय ठठेरा आणि भावेश भगतानी या दोघांना बुरखा टराटरा फाडला असून या बदमाशश्यांकडून 5 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे. पोलिसांनी या दोघांककडून एसी मशिन्ससह दागिने देखिल हस्तगत केले
आहेत.

कल्याण पूर्व परिसरात घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने या गुन्ह्यांतील आरोपींना जेरबंद करण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे त्यांच्या पथकाने परिसरात गस्त सुरू असताना दुचाकीवरील दोन तरुणांवर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला.

या दोघांची कस्सून चौकशी केली असता दोघे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली. अजय ठठेरा व भावेश भगतानी यांनी कल्याण पूर्वेत घरफोड्या केल्याची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून कल्याण पूर्व परिसरातील पाच घरफोड्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या दुकलीने आणखी किती ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.

Back to top button