Thane Metro | ठाण्यातील 3 महत्वाच्या प्रकल्पांसाठी 24 हजार कोटी

Thane Metro | मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, ठाणे वर्तुळाकार मेट्रो, ठाणे-बोरिवली भुयारी प्रकल्प होणार गतिमान
ठाणे मेट्रो
ठाणे मेट्रोpudhari file photo
Published on
Updated on

ठाणे : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या सोमवारी (दि.30) रोजी झालेल्या बैठकीत ठाण्यातील तीन महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मुख्य मेट्रोला जोडण्यात येणार्‍या वर्तुळाकार मेट्रोसाठी 12 हजार 500 कोटी, ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गासाठी 15 हजार कोटीचे कर्ज तसेच केमिकल रिसर्च केंद्राला भूखंड देण्यास मान्यता, अशा महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयामुळे ठाण्याच्या प्रकल्पांना मात्र गती मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षातेखाली सोमवारी मंत्री मंडळाची बैठक घेण्यात आली. ही बैठक शेवटची असल्याने या बैठकीत 38 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात कोट्यवधींच्या प्रकल्पना मंजुरी देण्यात आली आहे. मागील अनेक वर्ष रखडलेल्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापूर्वी केंद्राने देखील या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेकरांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाण्यासाठी वर्तुळाकार मेट्रोची आखणी करण्यात आली आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी असे मुख्यमंत्र्यांचे नियोजन आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकासप्रकल्पांना केंद्र शासनाचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे या प्रकल्पालाही गती मिळेल अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे शहरात सध्या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. शहराचा विस्तार होत असून तसेच शहर-जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावरुन 7 ते 8 लाख प्रवाशांची वर्दळ आहे. त्यामुळे 29 किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोच्या प्रकल्पमुळे वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होणार आहे.

दुसरीकडे ठाणे (टिकूजींनी वाडी) ते बोरिवली हे अंतर अवघ्या 20 मिनिटात पूर्ण करणार्‍या या मार्गाच्या कामासाठी 15 हजार कर्ज घेण्यासाठी देखिल मंजुरी देण्यात आली आहे. टिकूजींनी वाडी येथून जाणार्‍या संजय गांधी राष्ट्रीय उद्याना खालून भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. एमएमआरडीएचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः अग्रही आहेत.

लवकरच या मार्गाचे काम सुरु होणार असून या मार्गाचे काम 2028साली पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा भुयारी मार्ग झाल्यानंतर अवघ्या 15ते 20 मिनिटात बोरिवली येथे पोहचणे शक्य होणार आहे. घोडबंदर मार्गांवरून बोरिवली येथे जाताना होणार्‍या वाहतूककोंडीच्या त्रासातून प्रवाशांची सुटका होणार आहे. तर शिळफाटा येथे केमिकल रिसर्च सेंटर उभारण्यासाठी लागणारा भूखंड देण्यास देखिल मंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे.

असा आहे ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प...

एकूण 29 किमी लांबीच्या या प्रकल्पात 26 किमी लांबीचा मार्ग हा इलेव्हेटेड असून 3 किमीचा मार्ग हा भूमिगत आहे. प्रकल्पांर्गत एकूण 22 स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.

ठाण्यातील 3 महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी 24 हजार कोटी वर्तुळाकार मेट्रोची प्रस्तावित स्थानके...

  • वागळे इस्टेट

  • लोकमान्य

  • शिवाईनगर

  • गांधीनगर

  • मानपाडा

  • डोंगरीपाडा

  • वाघबीळ

  • आझादनगर

  • मनोरमानगर

  • कोलशेत

  • बाळकूम

  • राबोडी

  • ठाणे स्टेशन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news