ZP Thane | ठाणे पशुपक्षी प्रदर्शनात होणार 160 पशुपक्ष्यांचा समावेश

पशुपालकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
ठाणे जिल्हा परिषद
ठाणे जिल्हा परिषदPudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : शेतकरी व पशुपालक यांनी प्रेरणा घेऊन पशुपालन उद्योग, शेती व्यवसायाबरोबरच शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग अंतर्गत ‘जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन’ शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, बापगाव, भिवंडी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील पशुपालकांनी जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी केले आहे. या प्रदर्शनासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वल्लभ जोशी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.

या प्रदर्शनास प्रमुख पाहुणे वनमंत्री महाराष्ट्र राज्य गणेश नाईक, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य प्रताप सरनाई हे असून लोकसभा सदस्य डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, लोकसभा सदस्य बाळ्यामामा-सुरेश गोपीनाथ म्हात्रे, लोकसभा सदस्य नरेश गणपत म्हस्के, विधानसभा ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, रविंद्र चव्हाण, दौलत दरोडा, संजय केळकर, कुमार आयलानी, महेश चौगुले, विश्वनाथ आत्माराम भोईर, राजेश गोवर्धन मोरे, निरंजन वसंत डावखरे, डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड, किसान शंकर कथोरे, मंदा विजय म्हात्रे, डॉ. बालाजी प्रल्हाद किणीकर, शांताराम तुकाराम मोरे, नरेंद्र मेहता, रईस कासम शेख, सुलभा गणपत गायकवाड या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शन होणार आहे.

75 स्टॉल लावणार

या प्रदर्शनात 60 पशुधनांचे स्टॉल व 15 इतर स्टॉल असे एकूण 75 स्टॉल लावण्यात येणार आहेत. प्रदर्शनात 100 जात निहाय पशुधन व 60 पक्षी पाहण्यासाठी उपलब्ध असतील. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मदतीने शौचालय (मोबाईल टॉयलेट), अग्निशामक पथक, आरोग्य विभागामार्फत आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत विभागामार्फत सफाई कामगारांमार्फत सफाई व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news