

ठाणे : ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत 3 मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 14 वर्षीय मुलगी मैत्रिणी सोबत गरबा खेळण्यासाठी जाते सांगून गेली ती घरी परत आलीच नाही. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 28 सप्टेंबर रोजी 14 वर्षीय मुलगी हिने घरी मैत्रिणी सोबत मानपाडा येथे गरबा खेळण्यासाठी जाते असे सांगून मैत्रिणीसोबत गेली होती. गरबा खेळल्यानंतर सोबत आलेल्या मैत्रिणीला मुलीने दुसर्या मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून निघून गेली. मात्र मुलगी ही घरी 11-30 वाजण्याच्या सुमारापर्यंत पोहचली नाही. तेव्हा अपहृत मुलीच्या पालकाने मुलीच्या मैत्रिणीला विचारणा केल्यानंतर ती 10-30 वाजता दुसर्या मैत्रिणीकडे गेली.
त्यानंतर तिचा तिच्या पालकांनी शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिला कोणीतरी फुस लावून पळवून नेले. म्हणून पोलिस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे तपास सुरू आहे.