Railway Yard Accident: लोकलच्या टपावर सेल्फीच्या नादात बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

तो खासगी शिकवणीला न जाता दोन मित्रांसोबत ठाकुर्ली-चोळे रेल्वे यार्डात गेला होता.
Railway Yard Accident
Railway Yard AccidentPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: ठाकुर्ली-चोळे रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या लोकलच्या टपावर चढून फोटो काढण्याच्या प्रयत्नात १४ वर्षीय बालकाचा जिवंत विद्युत वाहिनीचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे गणेशनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बालक डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर येथील राजवैभव एन एक्स गृहसंकुलात राहत होता. तो खासगी शिकवणीला न जाता दोन मित्रांसोबत ठाकुर्ली-चोळे रेल्वे यार्डात गेला होता.

Railway Yard Accident
Kalyan Dombivli Investment Scam: कल्याण-डोंबिवलीत १००० कोटींचा गुंतवणूक घोटाळा; फसवणूककांडात अडकलेल्या ५००० गुंतवणूकदारांना गंडा

यार्डात उभ्या असलेल्या लोकलच्या डब्यावर शिडी आणि खिडकीचा आधार घेत मुलगा टपावर चढला. त्याचे मित्र खाली उभे राहून मोबाईलवर त्याचे छायाचित्र काढणार होते. टपावर उभे राहत असतानाच त्याचा हात वरून गेलेल्या जिवंत विद्युत वाहिनीला लागला. विजेच्या तीव्र धक्क्याने तो खाली फेकला गेला.

Railway Yard Accident
Eco Friendly Ganpati: पनवेलमध्ये शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींना वाढती पसंती

या घटनेनंतर मित्रांनी तातडीने कुटुंबीयांना माहिती दिली. मुलाला तात्काळ केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. एकीकडे या प्रकरणी वीि्णूनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. ते दुसरीकडे हा बालक राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news