आषाढीत रेल्वेला लाखोंचे उत्पन्न; दहा दिवसांत १ लाख ६६ हजार भाविकांचा प्रवास

आषाढीत रेल्वेला लाखोंचे उत्पन्न; १ लाख ६६ हजार भाविकांचा प्रवास
Central Railway
आषाढीत रेल्वेला लाखोंचे उत्पन्न; दहा दिवसांत एक लाख ६६ हजार भाविकांनी प्रवास file photo
Published on
Updated on

सोलापूर : पंढरपूरमधील लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांसह वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून ९२ विशेष तर नियमित १२० अशा दोन्ही मिळून २२० फेऱ्यातून एक लाख ६६ हजार १४२ प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून ८७ लाख २ हजार ३०९ रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Central Railway
एसटीने तीन महिन्यांत ९४ लाख प्रवाशांचा प्रवास; १८ कोटी रुपयांचे उत्पन्न

दरम्यान, भाविकांसाठी सोलापूर विभागातून विठ्ठल दर्शन घेता यावे व दर्शन झाल्यानंतर परत घरी जाता यावे यासाठी १२ ते २१ जुलैपर्यंत रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यात ८९ हजार ५९५ प्रवासी पंढरपुरात दाखल झाले. तर पंढरपूरातून दर्शन घेऊन परतीचा प्रवास ७६ हजार ५४७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. यात ४४ हजार ४०६ तिकिटांची विक्री होऊन या सर्वांनी काढलेल्या तिकिटातून रेल्वेला ८७ लाख २ हजार ३०९ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Central Railway
जालना : एक लाख महिलांचा अर्ध्या तिकीटात प्रवास; एसटीबसमध्ये महिलांची गर्दी वाढली

रेल्वेची माहिती

एकूण फेऱ्या - २१२

एकूण उत्पन्न - ८७०२३०९

एकूण प्रवासी - १६६१४२

एकूण तिकीट विक्री - ४४४०६

Central Railway
एसटीने तीन महिन्यांत ९४ लाख प्रवाशांचा प्रवास; १८ कोटी रुपयांचे उत्पन्न
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून भाविकांच्या सोयीसाठी दहा दिवस विशेष व नियमित रेल्वे गाड्यांची सोय केली होती. यातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळाले आहे.
योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news