सोलापूर : रुबीनगरात शिक्षिकेचे घर फोडून दागिने चोरले

सोलापूर : रुबीनगरात शिक्षिकेचे घर फोडून दागिने चोरले

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : रुबीनगर येथे राहणार्‍या शिक्षिका माधुरी देशपांडे या शाळेत गेल्यावर त्यांचे बंद घर फोडून चोरट्याने 3 लाख 47 हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.

याप्रकरणी माधुरी अनिरुध्द देशपांडे यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यांत फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, 21 जून रोजी 10.45 वाजण्याच्या सुमारास माधुरी देशपांडे या घरास कुलूप लावून शाळेत गेल्या होत्या. त्या दुपारी 1 वाजता घरी आल्या. यादरम्यान अज्ञात चोरट्याने देशपांडे यांच्या बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

लोखंडी कपाट उचकटून सोन्याचे लॉकेट, सोन्याच्या बांगड्या, सोन्याची कर्णफुले, देवीचे मंगळसूत्र, मंगळसूत्र, पोहळ्याचा हार असे 3 लाख 47 हजारांचे दागिने चोरुन नेले. या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास फौजदार मुरकुटे हे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news