श्रीकांत देशमुखांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

श्रीकांत देशमुखांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा भाजप सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध एका 32 वर्षीय महिलेने लग्‍नाचे आमिष दाखवून बलात्कार व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्याच्या डेक्‍कन पोलिस ठाण्यात दाखल केलेला हा गुन्हा सोलापूरच्या सदर बझार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्‍विनी भोसले यांनी सांगितले. फिर्यादी पीडित महिला पुण्यातील आहे. महिलेशी ओळख झाल्यानंतर देशमुख यांनी तीन वर्षांपासून पत्नीशी मतभेद असल्याचे फिर्यादी महिलेला सांगितले होते. तसेच पत्नीला लवकरच घटस्फोट देणार असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर देशमुख यांनी बलात्कार केल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

याबाबत एक व्हिडिओ देखील समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर दोनच दिवसात देशमुख यांनी राजीनामा दिला होता. दरम्यान, देशमुख यांनी महिलेला विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केला. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास महिला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादींनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. दरम्यान, आता या प्रकरणी पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात त्या 32 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, श्रीकांत देशमुख याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तिची फसवणूक केली. सोलापूरपासून या गुन्ह्याची सुरुवात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसूृन आले. त्यानुसार हा गुन्हा सोलापूरच्या सदर बझार पोलिस ठाण्यात वर्ग झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news