सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाचे आमिष
लग्नाचे आमिष

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमिष दाखवून व त्यानंतर तिच्या घरच्यांना ठार मारण्याची धमकी देवून एका अल्पवयील कॉलेजकुमारीवर बलात्कार केल्याप्रकरणी मारुती वाघमारे वय 21 रा. काटगांव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 19 ऑगस्ट रोजी एक अल्पवयीन मुलगी ही कॉलेजला गेली होती. त्यानंतर मारुती वाघमारे याने त्या मुलीला फोन करून होम मैदानावर बोलावून घेतले. दोघेजण मोटारसायकलवर तुळजापूरला दर्शनासाठी गेले.

तेथून ते दोघे वाघमारे याच्या मुळगावी काटगांव येथे गेले. तेथे घरात कोणी नाही याची संधी साधून त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. व पुन्हा तिला कॉलेजजवळ आणून सोडले. कॉलेज मधून ती मुलगी वडिलांसोबत घरी गेली. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी मारुती वाघमारे हा मुलीच्या घराजवळ आला. व तू माझ्यासोबत फिरायला चल, नाहीतर मी तुला पळवून नेईन, व तुझ्या घरच्यांनी विरोध केला तर घरच्यांना खल्लास करित अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून ती अल्पवयीन मुलगी ही त्याच्या मोटारसायकलवर बसली. त्या मुलीचा पाठलाग करण्यासाठी त्या मुलीची आई ही रिक्षात बसत असताना पडून जखमी झाली. आई पडलेली पाहून ती मुलगी मोटारसायकल वरून उतरली. व तिने आईला सर्व घटना सांगितली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news