

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा
सोलापुरातील गंगाई केकडे नगरजवळील राघवेंद्र नगर येथे घरामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने छापा टाकून तीन पीडितांची सुटका केली. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल केला असून आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली. त्यात आरोपी विजया नागनाथ खांडकेर (वय 40, रा. प्लॉट नंबर 114 राघवेंद्र नगर, गंगाई केकडे नगर) ही तीन महिलांची पिळवणूक करून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होती. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन येणार्या कमाईवर स्वतःची उपजीविका करत होती. तिला एमआयडीसी पोलिसांनी अटक करून तीन पीडितांची सुटका केली. ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त गुन्हे डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे पोलिस निरीक्षक महादेव राऊत, अश्विनी काळे, राजेंद्र बंडगर, हेमंत मंठाळकर, महादेव बंडगर, अलका शिपुरे, सुशीला नागरगोजे, नफिसा मुजावर, सुजाता जाधव, सीमा घोगरे, अरुणा परब, उषा मळगे, विशाल मस्के यांनी केली.