

Chincholi Tuljai Chemicals fire
पाकणी : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला आज (दि.३) सायंकाळी भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. कल्पेश सोडा यांच्या मालकीची ही केमिकल कंपनी असून आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
अतिशय भीषण आग असून अग्निशमन दलाचे चार ते पाच बंब आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाठ प्रयत्न करत आहे. आगीच्या धुराचे लोट बाहेर पडत आहेत. कंपनीतील सर्व कामगारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. कंपनीचा आजूबाजूचा संपूर्ण परिसर पोलिसांनी खाली केला आहे.