Solapur News: महापालिकेला शाळा देण्यास झेडपीचा विरोध

उपाध्यक्ष पवार, सभापती केदार यांचे स्‍पष्टीकरण : शाळा पुन्‍हा दिसणार झेडपीच्‍या यू-डायसवर
Solapur ZP
Solapur ZPPudhari
Published on
Updated on

सोलापूर : महापालिकेच्‍या हद्दवाढ भागातील जिल्‍हा परिषदेच्‍या ३६ शाळा महापालिकाकडे जाणार होत्‍या. मात्र, जिल्‍हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांनी या शाळा देण्यास विरोध केला आहे. त्‍यामुळे या शाळा पुन्‍हा यू-डायसवर दिसणार आहेत.

जिल्हा परिषद मालकीच्या ३६ शाळा यू-डायस प्रणालीमध्ये महानगरपालिकेच्या लॉगिनवर दिसू लागल्याने निर्माण झालेल्या संभ्रमानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पवार आणि शिक्षण समितीचे सभापती केदार यांनी स्पष्ट भूमिका घेऊन, जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित होऊ दिल्या जाणार नाहीत. या शाळा जिल्हा परिषदेच्याच राहतील आणि त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

यू-डायसवर जोडण्याचा विषय तांत्रिक

शाळा सोलापूर महानगरपालिका हद्दीत असल्याने माहिती संकलनासाठी त्या तात्पुरत्या स्वरूपात महानगरपालिकेच्या यू-डायस प्रणालीशी जोडण्यात आल्या आहेत. हा केवळ तांत्रिक विषय असून, आज शुक्रवारी शाळा पुन्‍हा यू-डायसवर दिसणार आहेत.

जि.प. लॉगिनवरून हटविल्‍याने गोंधळ

उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद मालकीच्या ३६ शाळा यू-डायस प्रणालीमध्ये जिल्हा परिषदेच्या लॉगिनवरून हटवून महानगरपालिकेच्या लॉगिनशी संलग्न झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले होते. यामुळे जिल्हा परिषदेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news