दोन दुचाकींची समोरासमोर धडक ः तरुण जखमी

Bike accident: उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल
Bike accident
दोन दुचाकींची समोरासमोर धडक ः तरुण जखमी File photo
Published on
Updated on

सोलापूर ः पानमंगळरुन येथून कडबगावकडे जाताना करजगी गावाजवळ समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने धडक दिली. यात ज्ञानेश्वर यल्लाप्पा शिवशरण (वय 23, रा. कडबगांव, ता. अक्कलकोट) हा जखमी झाला. उपचारासाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.

रिक्षा पलटी होऊन चालक जखमी

एसटी स्टँड येथून रेल्वे स्टेशनकडे रिक्षातून जाताना रिक्षा क्रमांक एम एच 13 जी 9632 नरसिंग गिरजी मिल गेटच्या समोर रिक्षा पलटी झाली. यात श्याम नारायण टिळे (वय 45, रा. सलगर वस्ती) हे जखमी झाले. उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.

घरगुती वादातून तरुणास मारहाण

अक्कलकोट रोड येथे घरगुती वादातून राजकुमार स्वामी याने मारहाण केली. आनंदय्या हिरेमठ (वय 32, रा. मलिकार्जुननगर) हा जखमी झाला. उपचारासाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.

शेतीच्या वादातून मारहाण

राळेरास बस स्टॉप येथे थांबले असता शेतीच्या वादातून उमेश भोसले, किशोर सावंत व इतर तिघांनी मारहाण केल्याने गणेश वसंत भोसले (वय 40, रा. शिवाजीनगर, बाळे) हा जखमी झाला. उपचारासाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.

शेतात काम करताना सर्पदंश

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे शेतात काम करताना सर्पदंंश झाला. यात लता मारुती लोहार (वय 38, रा. कुसूर, ता. दक्षिण सोलापूर) या जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news