Solapur News: सिलिंडरसाठीच्या रांगेतील युवकाला उन्हामुळे भोवळ

युद्धाचे परिणाम सोलापुरात होत असून, घरगुती सिलिंडरसाठी नागरिकांना भर उन्हात रांगेत उभे राहावेत लागत आहे
Solapur News
Solapur News: सिलिंडरसाठीच्या रांगेतील युवकाला उन्हामुळे भोवळPudhari
Published on
Updated on

सोलापूर : युद्धाचे परिणाम सोलापुरात होत असून, घरगुती सिलिंडरसाठी नागरिकांना भर उन्हात रांगेत उभे राहावेत लागत आहे. बुधवारी कुमठा नाका येथे सिलिंडरसाठी रांगेत उभारलेल्या असमद रफिक शेख या युवकास भोवळ आली. त्यामुळे तो खाली कोसळला.

सोलापुरातील तापमानाचा पारा 40 अंश पार झाला आहे. अशातच बुकिंग करूनही सिलिंडर घरी येत नसल्याने ग्राहक भरउन्हात गोडावून समोर रांगा लावत आहेत. यातच असमदला कडक उन्हामुळे चक्कर आली आणि तो जागीच कोसळला. नागरिकांनी त्याला तातडीने पाणी देऊन शुद्धीवर आणले. दरम्यान, सिलिंडर न उपलब्ध करणाऱ्या एजन्सीबद्दल ग्राहकांत संताप आहे.

सरकारी आदेश गेले कुठे?

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिकारी व गॅस वितरकांना 96 तासांत गॅस सिलिंडर घरपोच करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु तसे होत नसल्याने ग्राहक भरउन्हात सिलिंडरसाठी रांगा लावत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश गेला कुठे, अशी चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news