

सोलापूर : सराफ गल्लीतील सोन्या- चांदीच्या दुकानात स्कार्फ बांधून आलेल्या महिलेने हातचलाखीने 45 हजारांचे दागिने लंपास केले.
भीमाशंकर शेटप्पा करजगीकर (रा. 35 अ पूर्व मंगळवार पेठ) यांच्या सोने-चांदीच्या दुकानात एका लहान मुलीसह आलेल्या महिलेने तोंडाला कापडी स्कार्फ बांधला होता. तिने दुकानातील कर्मचाऱ्याची नजर चुकवून व हातचलाखी करून 45 हजार रुपये किमतीचे 3.90 ग्रॅम सोन्याचे राजकोट दोन वाटी चोरुन नेले. भीमाशंकर करजगीकर यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली.