रॉडने डोक्यात मारून तरुणाला केले जखमी

विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रॉडने डोक्यात मारून तरुणाला केले जखमी
file photo
Published on
Updated on

सोलापूर : येथील विजापूर रोड येथे देवनगर व्ही. व्ही. पी. कॉलेजसमोर लोखंडी रॉडने डोक्यात प्रहार करून जखमी केल्याची घटना आठ जानेवारी रोजी घडली.

याप्रकरणी रामचंद्र सुरेश बोगडे (वय 27 रा. सोरेगाव) यांच्या फिर्यादीवरून सचिन नागप्पा भडकुंबे (रा. देवनगर व्हीव्हीपी कॉलेज समोर सोरेगाव) यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्यादी हे घराबाहेर थांबला असताना यातील संशयित आरोपी हा त्याच्या घरासमोर असलेल्या बोळामध्ये प्रसाधनगृह करताना तू येथे प्रसाधगृह करू नको याचा आम्हाला त्रास होतो असे सांगताना यातील संशयित आरोपी याने मला काही बोलला तर बघ तुला येथेच झोपवतो असे म्हणून लोखंडी रॉडने डोक्यात मारून जखमी केले. तसेच फिर्यादीच्या घरी जाऊन तो माझं काही वाकड करू शकत नाही मी त्याला बघून घेतो असे म्हणून फिर्यादीच्या पत्नीस शिवीगाळ व दमदाटी केली असे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल राठोड हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news