Pandharpur Drowning death: चंद्रभागेत तरुण बुडाला

अवैध वाळू उपशामुळे पात्रात खड्ड; बचाव पथकही नाही
Drowning death
Drowning deathPudhari
Published on
Updated on

पंढरपूर : श्री विठ्ठलच्या दर्शनासाठी आलेला आंध्र प्रदेशमधील तरुण चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी गेला असता पाण्यात बुडाला.

भार्गव राजा कटम (वय 20, रा. विणुगोंडा जि. गुंटूर , आंध्र प्रदेश) असे तरुणाचे नाव आहे. त्याला नदीपात्रातील खड्ड्याचा व पाण्याचा अंदाज न आल्याने गुरुवार, दि. 30 रोजी सकाळी ही घटना घडली. शोधकार्य सुरू असून गुरुवार सायंकाळपर्यंत तो सापडलेला नव्हता. वाळू उपशाने ही दुर्घटना घडल्याचा आरोप भाविक करत आहेत.

भार्गव कटम हा गुरुवारी सकाळी नदीमध्ये पवित्र स्नानासाठी नातेवाईकासह गेला होता. मात्र, खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. पंढरपूर नगरपरिषद व विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत टीम ठेवणे गरजेचे आहे. मात्र, टीम ठेवली नसल्यामुळे भाविक बुडाल्याचा आरोप महर्षी वाल्मीक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news