

बार्शी : तालुक्यातील खडकलगावात एका तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. सोमनाथ सुरेश रोंगे (वय 35, रा. खडकलगाव) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
स्वप्निल हनुमंत रोंगे यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा चुलत भाऊ सोमनाथ हा त्यांच्या शेजारी त्याचे कुटुंबीयांसह राहण्यास आहे. ते शेतात असताना गावातील खडके हा पेरणीकरिता ट्रॅक्टर घेऊन त्याच्या शेतामध्ये चालला होता. त्यावेळी त्यास सोमनाथ यांनी लिंबाच्या झाडास गळफास घेतल्याचे दिसून आले. तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे.