

सोलापूर : जगात वैद्यकीय क्षेत्रात अनेक संशोधनं झाली, त्याचा मानवी शरीराला चांगला उपयोग झाला. मात्र, जगातील एकाही तज्ज्ञाला मानवी शरीरातील रक्ताला पर्याय शोधण्यात यश आले नाही. शहर जिल्ह्यातील 22 रक्तसंकलन केंद्रांच्या शिबिरात दीड लाखाहून अधिक जणांनी रक्तदान केले.
कार्ल लँडस्टीनर या शास्त्राज्ञांनी पहिल्यांदाच रक्तातील एबीओ या रक्तगट प्रणालीचा शोध लावला. म्हणून 14 जून हा त्यांचा जन्मदिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाला. रक्तदान करू या, उमेद देऊ या, एकत्रितपणे आपण जीव वाचवू या ही घोष वाक्य घेऊन शासकीय व अन्य संस्था रक्तदानाच्या चळवळीत योगदान देतात. रक्तदान हे एकता व पुर्नप्राप्तीचे प्रतिक आहे. विना मोबदला स्वखुशीने जे रक्तदान करतात. ते ऐच्छिक रक्तदाते असतात. म्हणूनच त्यांचा सन्मान होतो. वैद्यकीय क्षेत्राने अनेक शोध लावत मोठी क्रांती केली. पण, अद्यापही मानवी रक्त तयार करण्यात यश आले नाही. म्हणूनच, रक्ताला मानवी रक्तच पर्याय आहे. अन्य पर्याय उपलब्ध नाही. एका रक्तदात्यामुळे लाल पेशी, प्लाझमा व प्लेटलेट या रक्तघटकाचा उपयोग तीन रुग्णांना होतो.
मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसुति दरम्यानचा अति रक्तस्राव. अपघात व गंभीर आजाराने ग्रस्त रूग्णांना रक्ताशिवाय वाचत नाही. शिवाय, थॅलेसिमिया, सिकलसेल निमियाने ग्रस्त रूग्णांचे प्राण रक्ताशिवाय वाचत नाही. निगेटिव्ह ग्रुपच्या रक्तदात्यांचे रक्त नेहमी राखीव ठेवल जाते. गरज पडेल तसे त्यांना केंद्रात बोलावल जात. शरीरातील पाच लिटर रक्तापैकी 450 मिली रक्त घेतल जात. ते रक्त 24 तासात शरीरात तयार होतं. रक्तदात्याच किमान वजन 45 पेक्षा जास्त असावा. व, 18 ते 65 या वयोगटातील कोणालाही रक्तदाता होता येते. मात्र, त्याच्या शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 ग्रॅम पर डेसीलिटर पेक्षा जास्त असावा. निरोगी माणूस दर तीन महिन्यानी रक्तदान करू शकेल. मद्यपानानंतर 24 तासांनी रक्तदान करू शकतो. महिला मासिक पाळीचा काळ वगळता नियमित रक्तदान करू शकतात. मात्र हिमोग्लोबीनचे प्रमाण चांगले असावेत. प्रसुतीनंतर एक वर्षभर रक्तदान करता येत नाही.
शासकीय वगळता अन्य रक्तसंकलन केंद्राकडून रक्तदात्याला व आयोजकांना अमिष दाखवली जाते. याचा फटका सरकारी रक्तसंकलन केंद्राला बसतो. कारण, यांच्याकडून आयोजकांसह रक्तदात्यांना भेटवस्तू देता येत नाही. यामुळे या पवित्र क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. ती थांबण्याची गरज आहे. याचा फटका एखाद्या गरीब रूग्णाला नक्कीच बसतो. रक्तदान चळवळीकडे व्यवसाय म्हणून न पाहता सेवा, म्हणून पाहावी.