

माढा : निवडणुकीच्या काळात मनोज जरांगे यांना भेटणारी नेतेमंडळी आता कुठे दिसत नाहीत. मराठा नेत्यांना जरांगे यांची जाण राहिली नाही. असा घणाघात मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी माढा येथे बोलताना केला.
माढा येथे जगदाळे फंक्शन हॉलमध्ये मराठा योध्दा मनोज जरागे यांच्या 29 ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माऊली पवार बोलत होते. बैठकीसाठी विचार मंचावर समन्वयक राजन जाधव, अॅड. श्रीरंग लाळे, डॉ. प्रमोद पाटील, महेश पवार, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आपल्या पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी आरक्षणाच्या मनोज जरांगे यांच्या अखेरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी मान्यवरांनी मुंबईला जाण्यासाठी कशी व्यवस्था करायची, काय मागण्या आहेत. याची सविस्तर माहिती दिली. बैठकीसाठी माढा शहर व परिसरातील अनेकजण उपस्थित होते.सूत्रसंचलन बाळासाहेब चवरे यांनी केले.