महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध

पालकमंत्री पाटील : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा तीन कोटी महिलांना लाभ
Committed to women empowerment
बुर्ला महिला महाविद्यालयात आयोजित मेळाव्यात बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील. यावेळी दशरथ गोप, मोहन डांगरे आदी.Pudhari File Photo

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, महिलांना वर्षभरात तीन सिलिंडर मोफत, आश्रमशाळामधील 18 वर्षांपुढील मुलींना शिक्षण शुल्क माफ, ‘पिंक रिक्षा’ योजना, ‘लेक लाडकी’ योजनेसह अन्य योजनांचा समावेश आहे. अशा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या शनिवारी (दि. 6) झालेल्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य टी.एन. शिंदे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे उपस्थित होते. ए. आर. बुर्ला महाविद्यालयासाठी विशेष बाब म्हणून कायमस्वरूपी शिक्षक, मुलींना हद्दवाढ भागात मोफत बस पास, कार्यक्रमासाठी एक सभागृह बांधून देण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

Committed to women empowerment
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कृतज्ञता मेळाव्यात वादळी वाऱ्याने मंडप उडाला

प्रास्ताविक मोहन डांगरे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या वतीने कला शाखेची विद्यार्थिनी प्राची भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. दशरथ गोप यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याविषयी माहिती दिली. राज्य शासनाने मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचे त्यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news