Election process: मतदारांना दोनदा करावे लागणार मतदान

गटासाठी पांढऱ्या तर गणांसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका
Election
Electionspudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी येत्या दि. 7 फेबु्रवारी रोजी मतदान होत असून, मतदारांना मतदान केंद्रात गेल्यानंतर दोनदा मतदान केल्यानंतरच मतदानाची प्रक्रीया पूर्ण होणार आहे. जिल्हा परिषद गटांसाठी पांढऱ्या रंगाची तर पंचायत समिती गणांसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी तर पंचायत समितीच्या 136 गणांसाठी ही मतदान होणार असून, 2 हजार 758 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदान सकाळी 7.30 वाजल्यापासून होणार आहे. या निवडणुकीत 24 लाख 59 हजार 227 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 15 हजार 200 कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यात 24 लाख 59 हजार 220 मतदार मतदान करणार असून, यात 12 लाख 77 हजार 61 पुरुष तर 11 लाख 82 हजार 83 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी आयोगाने निवडणूक ओळखपत्र अनिवार्य केले आहे. यानुसार मतदारांनी मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा छायाचित्र असलेला कोणताही वैध पुरावा असून, मतदान केंद्रावर जाताना ही ओळखपत्रे सोबत बाळगावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news