Voter list verification: अन्यथा मतदानाचा हक्क हुकणार

तीन वेळा मिळणार संधी; बीएलओ येणार मतदारांच्या घरी
Voter List
Voter List Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू केला असून, यात मतदार यादीतले डुप्लिकेट, मयत, शिफ्ट, दुबार झालेले मतदार काढून नवीन पात्र लोकांची यादी नावे समाविष्ट केली जाणार आहे. त्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी हे तीन वेळा मतदारांच्या घरी येऊन नवीन पात्र लोकांची नावे नोंदवून देणार आहे. त्यासाठी एक फॉर्म दिले जाणार आहे. बीएलओ तुमच्या घरी ३ वेळा येईल. त्या ३ वेळात तुम्ही भेटला नाहीत आणि फॉर्म भरला नाही तर मतदार यादीतून नाव बाद होऊ शकते.

सोलापूर जिल्ह्यात ३९ लाख ३८ हजार ६३१ मतदारांसाठी ३ हजार ७२३ बीएलओमार्फत हे अभियान राबविले जाणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बीएलओंना प्रत्येक मतदारांच्या घरी भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत.

२००२ च्या यादीत नाव असेल तर फक्त मॅपिंग फॉर्म भरून द्यावे लागणार आहे. ०१ जुलै १९८७ पूर्वी जन्म असून मतदार यादीत नाव नसेल तर जन्मतारीख आणि जन्मस्थळ पुरावा द्यावा लागणार आहे. ०१ जुलै १९८७ ते ०२ डिसेंबर २००४ दरम्यान जन्म झाला असल्यास स्वतःचा, आई किंवा वडिलांपैकी एकाचा जन्म पुरावा द्यावा लागेल. ०२ डिसेंबर २००४ नंतर जन्म झाला असल्यास स्वतःचा, आई-वडील दोघांचाही जन्म पुरावा द्यावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news