विठ्ठलास अलंकार, रुक्मिणीस महालक्ष्मी पोशाख परिधान

नवरात्र महोत्सवानिमित्त आठवी माळ; मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली
Solapur News
पंढरपूर : श्री विठ्ठलास सोन्याचे अलंकार, तर रुक्मिणीमातेस कोल्हापूरच्या महालक्ष्मीमातेच्या धर्तीवर पोशाख परिधान करण्यात आला होता.Pudhari Photo
Published on
Updated on

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरुवात झालेली आहे. यानिमित्त दुपारी दरवर्षी प्रथा-परंपरेप्रमाणे आठव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रुक्मिणीमातेस महालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आला. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी मंदिरात दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. गुरुवार दि. 10 रोजी आठव्या माळेनिमित्त श्री विठ्ठलास नक्षी टोप प्रभावळसह कौस्तुभ मणी, दंडपेठ्या जोड, हिर्‍यांचा कंगण जोड, मोत्यांची कंटी एक पदरी, मोत्यांची कंटी दोन पदरी, मारवाडी पेठ्याचा मोत्यांचा हार, मोत्यांचा तुरा, मत्स्य जोड, तुळशीची माळ, तोडे जोड, बाजीराव कंठी, चांदीचा कस्त्य हे अलंकार परिधान करण्यात आले आहेत.

रुक्मिणीमातेस सोन्याचा मुकुट, जडपाचा हार, बाजुबंद जोड, खड्याची वेणी, पाचूची गरसोळी, चिंचपेटी हिरवी, कोल्हापुरी साज, मद्रासी कंठा, ठुशी, सोन्या मोत्यांचे तारवड जोड, बाजीराव गरसोळी, खड्यांची बिंदी, मळ्यामोत्यांच्या पाटल्या जोड, सोन्याचे बाजुबंद जोड, मत्स्य जोड, रूळ जोड, पैंजण जोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, ठुशी नवीन, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, चंद्रहार, अष्टपैलू मण्यांची कंठी, चंद्रहार मोठा, गोल मण्यांची कंठी, सूर्य इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. राधिकामातेस चांदीचा मुकुट, पुतळ्यांची माळ, हायकोल, जवेच्या माळा, मोत्यांचा कंठा व सत्यभामादेवीला मुकुट, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, पुतळ्यांच्या माळा, जवेची माळ इत्यादी अलंकार व प्रथा-परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी मंदिरात दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत.

परिवार देवतांनादेखील पारंपरिक पोशाख

श्री विठ्ठल, रुक्मिणीमातेबरोबरच मंदिर समितीच्या अख्त्यारित असलेल्या परिवार देवतांपैकी शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लम्मादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांनादेखील पारंपरिक पोशाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news