Vitthal Rukmini: श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पारंपरिक चंदनउटी पूजेला प्रारंभ

मंदिरात आकर्षक फुलांची सजावट : नववर्षानिमित्त दर्शनासाठी गर्दी
Vitthal Rukmini
Vitthal Rukmini Pudhari
Published on
Updated on

पंढरपूर : चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. या सजावटीमुळे विठ्ठल-रुक्मिणीचे रूप अधिकच मनमोहक व प्रसन्न दिसले. दरम्यान, ग्रीष्म ऋतूमध्ये वाढणाऱ्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्तींना शीतलता लाभावी याकरिता परंपरेनुसार चंदनउटी पूजा पार पडणार आहेत. याची गुढीपाडव्यानिमित्त सुरुवात करण्यात आली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर- पाटील (रा. रांजणगाव, महागणपती) यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली आहे. सजावटीचे काम डेकोरेटर्स कुमार शिंदे व पुण्यातील श्री फ्लॉवर्स यांनी पार पाडले. या कामासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले.

दरवर्षी महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या निमित्ताने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात विशेष फुलांची आरास केली जाते. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या मंदिरामुळे विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूरात दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच नामगजराने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news