Vitthal Rukmini: खग्रास चंद्रग्रहणाच्या स्पर्शानंतर विठ्ठल-रुक्मिणीला चंद्रभागेचे स्नान

खग्रास चंद्रग्रहण असल्याने श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी माता यांच्या नित्योपचार व पूजाविधीच्या वेळेत शास्त्रोक्त नियमानुसार आवश्यक बदल करण्यात आले
Pandharpur Vitthal Mandir
Pandharpur Vitthal MandirPudhari
Published on
Updated on

पंढरपूर : खग्रास चंद्रग्रहण असल्याने श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी माता यांच्या नित्योपचार व पूजाविधीच्या वेळेत शास्त्रोक्त नियमानुसार आवश्यक बदल करण्यात आले. त्यानुसार ग्रहण स्पर्शानंतर सायं. 06.34 वा.श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी माता तसेच मंदिरातील व मंदिराबाहेरील सर्व परिवार देवतांना चंद्रभागा नदीचे पाणी आणून स्नान घालण्यात आले.

ग्रहण मोक्षानंतर (सायं. 06.48 वा.) सर्व देवतांना पुनः स्नान घालून शुद्धीकरण विधी पूर्ण करण्यात आला. यानंतर धुपारती, रात्रीची शेजारती नेहमीप्रमाणे करण्यात आली. खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श सायं. 06.34 वा. सुरू झाला तर मोक्ष सायं. 06.48 वा. झाला आहे. पंढरपूर येथे सूर्यास्त सायं. 06.34 वा. होत असल्याने सायं. 06.34 ते 06.48 या कालावधीत ग्रहण नियम पाळण्यात आले. यावेळी भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. ग्रहण सुटल्यानंतर श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले.

ग्रहण काळातील सकाळी 10.45 ते 11 वा. महानैवेद्यामध्ये नेहमीचा नैवेद्य दाखविण्यात येणार नाही. त्याऐवजी सुकामेवा नैवेद्य दाखविण्यात आला. तर दुपारचा नैवेद्य ग्रहणाचा वेध सुरू झाल्याने लाडूचा नैवेद्य दाखविण्यात आला नाही. त्याऐवजी सुकामेवा दाखविण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news