Mandal Officer Statement Torn | मंडल अधिकाऱ्याच्या जबाब फाडल्याप्रकरणी विकास देवकर यांना अटकपूर्व जामीन

Police Constable FIR | पोलिस शिपायावर जबाब फाडल्याचा गंभीर आरोप
Mandal Officer Statement Torn
मंडल अधिकाऱ्याच्या जबाब फाडल्याप्रकरणी विकास देवकर यांना अटकपूर्व जामीन (File Photo)
Published on
Updated on

केम : महसुली कामकाज प्रकरणात मंडल अधिकाऱ्याचा हातातील अधिकृत दस्तऐवज जबरदस्तीने फाडल्या प्रकरणी पोलीस शिपाई विकास बाळू देवकर यांच्या वर गुन्हा दाखल झाला होता.

बार्शी न्यायालयात या संदर्भात खटला सुरू होता ११ जुलै रोजी विकास बाळू देवकर यांना न्यायालयाकडून ५०,००० रूपयांच्या वैयक्तिक हमीवर अटकपूर्व जामीन मंजूर झाला. अॅड. मंगेश अनिरुद्ध अरनाळे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले.

Mandal Officer Statement Torn
Solapur Crime : सोलापुरात चड्डी गँग सक्रिय; पॉश एरियात होतेय रेकी

हि घटना १८जून २०२५ रोजी केम तालुका करमाळा येथे घडली मंडल अधिकारी मीरा नागटिळक यांनी करमाळा पोलीसात तक्रार दाखल केली होती त्या केम येथे वादग्रस्त जमिनी संदर्भात पाहणी करण्यासाठी गेल्या असता विकास बाळू देवकर यांनी त्यांच्या हातातील जबाब फाडून नवीन जबाब घेण्याचा दबाव टाकून शिवीगाळ केली असल्याचा आरोप दाखल केलेल्या तक्रारीत केला होता विकास बाळू देवकर हे पिंपरी चिंचवड येथे येथे पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news