वेंगुर्ले होमिओपॅथिकच्या तीन विद्यार्थ्यांना मारहाण

student assault case: सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल
Sindhudurg Crime News |
वेंगुर्ले होमिओपॅथिकच्या तीन विद्यार्थ्यांना मारहाणFile Photo
Published on
Updated on

वेंगुर्ले ः वेंगुर्ले येथील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे बीएचएमएसचे शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना कॉलेजमधील दोघे आणि पाच अज्ञातांनी मारहाण केली. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध वेंगुर्ले पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण किरकोळ कारणावरून झाल्याचे समजते.

याबाबत गणेश सुग्रीव जायभाय (वय 25, रा. बीड, सध्या रा. वेंगुर्ला) याने वेंगुर्ले पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. ही घटना मंगळवार 8 एप्रिल रोजी रात्री 8.30 ते 8.45 वा.च्या दरम्यान सिद्धिविनायक हॉल समोरील भागात घडली. यामध्ये शमन कनोजिया (सध्या रा. वेंगुर्ला भटवाडी), संजय चव्हाण (रा. आंबेडकर वसतिगृह वेंगुर्ला) यांनी तसेच अन्य अज्ञात 5 जणांनी मारहाण केली. तसेच धमकी दिली, असे गणेश जायभाय याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सोबत असलेल्या विशाल खांडेकर (रा. सोलापूर) व विजय दळवी (रा. बुलढाणा) यांनाही दुखापत व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दाखल फिर्यादीनुसार शमन कनोजीया व संजय चव्हाण तसेच अन्य 5 अज्ञात अशा एकूण 7 जणांविरोधात वेंगुर्ले पोलीस स्थानकात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पीएसआय राठोड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news