

सोलापूर : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे 1 हजार 547 हेक्टरवरील फळबाग, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे माळशिरस तालुक्यातील झाले असून, अनेक तालुक्यातील द्राक्षे, केळी आंब्याच्या बागा झोपल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः फळबागा आणि खरीप पिकांना याचा मोठा फटका बसला असून, एक हजार 500 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे. मार्च महिन्यात अवकाळी, गारांचा पाऊस पडल्यामुळे द्राक्ष, डाळिंब, आंबा यांसारख्या फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत.
तसेच गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी, गारपीट पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे