

मोहोळ : पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या वळवासह मान्सून पूर्व पावसाने कधी नव्हे तो मे महिन्यात ऐन आंब्याच्या हंगामात धुमाकूळ घातल्याने मार्केटमध्ये भाव खाणारा कोकणसह फळांचा राजा असलेला ’हापूस’ जमिनीवर आला. हापूस पाठोपाठ तोर्यात असणारा केशर ’पायरी’वर आला आहे. तर स्थानिक बाजारात आपापली वेगवेगळी चव घेऊन येणार्या पायरी व गावरान आंबाने बाजारातून गायब झाला. त्यामुळे अवकाळीसह मान्सूनपूर्व पावसाने पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घातल्याने फळांच्या ’राजा’ चा तोरा पूरता उतरला आहे.
पावसाळ्यात आंब्याचे दर कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात मुख्य कारण म्हणजे अवकाळी पाऊस, उष्णतेची लाट, आणि हवामानातील बदल यामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होतो. यामुळे आंब्याची गुणवत्ता आणि उत्पादन घटते, ज्यामुळे दर कमी होतात. आंब्याच्या उत्पादनात वाढ,ज्यामुळे पुरवठा वाढतो आणि मागणी कमी होते. तसेच,पावसाळ्यात आंब्याची गुणवत्ता घटल्याने मागणी कमी होते. पावसाळ्यात आंब्यावर बुरशी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते,ज्यामुळे आंब्याची गुणवत्ता घटते.त्यामुळे ग्राहकांची मागणी कमी होते आणि दर कमी होतात.दुसरे कारण म्हणजे जास्त प्रमाणात आंबे विकण्यासाठी बाजारात तयार असतात, त्यामुळेही दर कमी होतात.
स्थानिक केशर -100 रुपयांना दीड किलो
कर्नाटकी केशर -100 रुपये दीड किलो
रत्नागिरी,देवगड हापूस - 500 ते 800रुपये डझन
बदाम - 100 रुपये दीड ते दोन किलो
गावरान - 40 ते 60 रुपये डझन