

सोलापूर : शहरातील जुना तुळजापूर नाका येथे ट्रकच्या धडकेत एक अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.11) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. जुना तुळजापूर नाका येथून तुळजापूर रोडवर ट्रक (एम.एच. 18 बी.आय. 4861) जात होता. यावेळी 35 ते 40 वर्षाच्या अनोळखी इसमास ट्रकची धडक लागली. ट्रकच्या मागील चाकाखाली तो सापडला. यामध्ये इसमाच्या डोक्यावरून चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. अपघाता नंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.
अपघाताची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. इसमाचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
दुचाकीची चोरी
विजापूर रोड वरील देशमुख नगर येथून पंचवीस हजारांची दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत रमेश कृष्णाजी इंगळे (वय 42, रा. रेवणसिद्ध नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधीत चोरट्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.