Solapur News: जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवरील 938 भोंगे काढले

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी शिष्टाईने सोडवला प्रश्न
Solapur News: जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवरील 938 भोंगे काढले
File Photo
Published on
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील मशिद, मंदिरासह धार्मीक स्थळांवरील तब्बल 938 भोंगे ग्रामीण पोलिसांनी शिष्टाईने उतरवले. आतपर्यंत सर्वाधिक भोंगे उतरवण्यात ग्रामीण पोलिसांनी आघाडी घेतली आहे. पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

सोलापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मंदिरे व मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष मोहीम राबविली. यामध्ये जिल्ह्यात नियमबाह्य लावण्यात आलेले धामर्कीक स्थळांमधील मंदिरांवरील 581 तसेच मशिदींवरील 357 असे एकूण 938 भोंगे पोलीस प्रशासनामार्फत काढण्यात आले.

सदरची कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू न देता अत्यंत शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही समाजातील मंदिर व मशिदीतील ट्रस्टींनी कायद्याचा आदर ठेवून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीने राज्यात आदर्श निर्माण केला आहे. कोणताही अनुचित प्रकार, तक्रार न होता हे भोंगे उतरविण्यात पोलिसांना यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news