Ujani dam water release: उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणार

हिळ्ळी व खानापूर ग्रामस्थांची टेल एण्डपर्यंत पाणी सोडण्याची मागणी
Ujani dam
Ujani damPudhari
Published on
Updated on

हंजगी : उजनीतून 15 एप्रिल पासून उजनीतून खाली भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी खाली हिळ्ळी व खानापूर टेल एण्डपर्यंत सोडण्याची मागणी आता या भागातील शेतकरी करताना दिसून येत आहेत.

अक्कलकोट तालुक्यात सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.तसेच शेतीसाठी बंधाऱ्यातील पाण्याची उपसा अधिक होत असल्याने सध्या हिळ्ळी व खानापूर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी घटली गेली आहे.आता दहा ते बारा दिवसच पुरेल इतका पाणीसाठा बंधाऱ्यात शिल्लक राहिल्याने हिळ्ळी व खानापूर परिसरातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवन होऊन दिवसेंदिवस बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. हिळ्ळी बंधाऱ्याच्या खाली महाराष्ट्र सरकारची तीन किलोमीटर पर्यंत हद्द आहे. सध्या या भागात पाणीच शिल्लक नसल्याने जनावरांचे व वाडी वस्तीवरील जनतेचे हाल होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news