

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण शुक्रवारी (दि. 18) शून्यावर येणार आहे. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस होऊनही धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे.
उजनी धरणावर सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा यासह इतर काही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. याशिवाय धाराशिव शहरालाही याठिकाणहून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रासाठी उजनीतून पाणी घेतले जाते. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकर्यांसाठीही हे धरण आशेचा किरण आहे.
उजनी धरणातून सध्या सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे. सोलापूर शहराला पाणी सोडल्यामुळे पुढील दोन महिने शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. डिसेंबर महिन्यात 100 टक्क्यांवर असलेले उजनी धरण एप्रिल महिन्यात शून्यावर आले आहे.